Breking News

सिल्वर ओक’वर ३ तास बंद दाराआड खलबतं ! पार्थ पवार-शरद पवारांची बैठक,

मुंबई  (लक्ष्यवेध न्यूज) :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) खासदार पार्थ पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे

पार्थ पवार हे शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड बैठक पार पडली.

पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पार्थ पवार आणि शरद पवार यांची बैठक सुरू झाली. ही बैठक जवळपास तीन तास म्हणजे रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती. दोन राजकीय पक्षांचे प्रमुख असलेल्या आजोबा-नातवामध्ये राजकीय मुद्यावर बैठक झाली असण्याची शक्यता आहे.

या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या बैठकीने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडवून येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याची आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊन (विलीनीकरण) काम करणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री पार पडलेल्या या ३ तासांच्या बैठकीत विलीनीकरणाच्या संभाव्य अटी व शर्ती काय असाव्यात, यावर सविस्तर चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button