धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्याने राखीव ठेवण्यात येणार -जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी( लक्ष्यवेध न्यूज):-राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढच्या पावसाळ्यापर्यंत नियोजन करावे लागणार आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य आणि त्यानंतर उर्वरित पाणी शेतीसाठी, असा प्राधान्यक्रम असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
“महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लोणी येथून सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील वाढत्या वीज टंचाईच्या बाबतीत शासनाने तातडीने व गांभीर्याने काही ठोस निर्णय घ्यावे लागतील, अशी आग्रही सूचना करण्यात आली.
जनावरांच्या चाऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, चारा उपलब्ध करून देण्यासाठी डीबीटी यंत्रणेचा वापर करावा. पशुधनाची जनगणना झालेली आहे. लम्पी आजारामध्ये जनावरांच्या लसीकरणाचा डेटाही प्रशासनाकडे उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चाऱ्याचे थेट अनुदान डीबीटीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. एक नवी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध झाली आहे, तिचा उपयोग करून घेतला पाहिजे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
टंचाईच्या काळात अनावश्यक खर्च टाळा,
“राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने विवाह करावेत, अशी सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करणार असून, या संदर्भात काही नियमावली करण्याची विनंती शासनास करणार आहे. खर्चावर बंधन घालून घेणे ही या संकटात महत्त्वाची बाब आहे,” विविध प्रकारच्या कार्यक्रमात होणारा अनावश्यक खर्च कमी करून आयोजन करण्यात यावेत असे आवाहन करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील तीन महिने चारा पुरेल इतकी उपलब्धता असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ग्रामीण भागातील भारनियमनाच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांमध्ये संवेदनशील वातावरण निर्माण झाले असल्याकडे त्यांनी सांगितले.



