कोल्हार बुद्रुक–भगवतीपूर येथे 28 सफाई कामगारांचा सन्मान

कोल्हार( लक्ष्यवेध न्यूज ):-आज दि. 1 मे रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर येथे सफाई कामगारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. सुनिता व दत्तात्रय रंभाजी राऊत (सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी) यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही ग्रामपंचायतीतील एकूण 28 सफाई कामगारांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व मिठाई देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमात कोल्हार बुद्रुकचे मा. सरपंच ॲड. सुरेंद्रभाऊ खर्डे पाटील , बोरुडे ताई प्रशासक सरपंच, कोल्हार बुद्रुक, दत्तात्रय राजभोज,प्रशासक सरपंच भगवतीपूर, प्रकाश खर्डे उपसरपंच, भगवतीपूर, साहेबराव दळे पाटील उपाध्यक्ष, देवालय ट्रस्ट, रावसाहेब खर्डे मा. सरपंच, भगवतीपूर, गोरक्षनाथ खर्डे, संतोष लोखंडे, शाम लोखंडे, शशिकांत चौरे,ग्रामविकास अधिकारी, कोल्हार बुद्रुक,पत्रकार बांधव दोन्ही ग्रामपंचायतीतील कर्मचारीवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



