Breking News

दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 92.16 टक्के

नेवासा फाटा( लक्षवेध न्यूज ):-फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये संपन्न झालेल्या शालांत उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 92.16 टक्के लागला आहे.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील उच्च माध्यमिक विद्यालयातून फेब्रुवारी/ मार्च 2026 मध्ये संपन्न झालेल्या शालांत उच्च माध्यमिक परीक्षेस एकूण 523 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 358 विद्यार्थी विज्ञान शाखेतून परीक्षेस प्रविष्ट झाले होते. गणेश रोहिदास औताडे विज्ञान शाखेतून 85.67% गुण मिळवत विद्यालयात प्रथम, समर्थ दत्तात्रय वांढेकर याने 85% गुण मिळत द्वितीय तर गायत्री राजेंद्र वाळुंजकर हिने 81.67% गुण मिळवत विद्यालयात तृतीय क्रमांक संपादित केला.

कला शाखेतून ९३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुरज राजू पवार याने 82% गुण मिळवत विद्यालयात प्रथम, साक्षी आप्पासाहेब बर्वे हिने 73.5% गुण मिळत द्वितीय तर आकांक्षा दत्तात्रय कणगरे हिने ७२.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादित केला.

वाणिज्य शाखेतून एकूण 72 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी प्रीती संभाजी जावळे हिने ८२ टक्के गुण मिळत विद्यालयात प्रथम, कोमल लक्ष्मण माने हिने ७४ टक्के गुण मिळवत द्वितीय तर स्नेहा गणेश हंबीर हिने 70 टक्के गुण मिळत तृतीय क्रमांक संपादित केला. एकूण दहा विद्यार्थी विशेष प्राविन्यासह उत्तीर्ण झाले असून 102 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड सुमती साहेबराव घाडगेपाटील, उपाध्यक्ष ॲड स्नेहल चव्हाणपाटील,डॉ. श्रुती आमलेपाटील, चेतन चव्हाणपाटील, डॉ. गौरव आमलेपाटील, प्राचार्य सोपान काळे, पर्यवेक्षक संजयसिंह चौहान, विभाग प्रमुख संतोष निंबाळकर,बाळासाहेब साबळे,एकनाथ कापसे, अंजली होन, नामदेव ताके,दत्तू गर्जे व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button