Breking News

श्री श्री रविशंकरजी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

वडाळा महादेव( लक्ष्यवेध न्यूज):- जागतिक शांततेचे अग्रदूत आणि ‘दि आर्ट ऑफ लिविंग’ संस्थेचे संस्थापक पपू श्री श्री रविशंकर जी यांचा १३ मे रोजी ७० वा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आणि विशेषतः श्रीरामपूर तालुक्यात विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ श्री श्री रविशंकर जी संपूर्ण जगाला एका विचाराच्या सूत्रात बांधण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उदात्त कार्याला अभिवादन म्हणून ‘दि आर्ट ऑफ लिविंग’ श्रीरामपूर तसेच प्रोजेक्ट भारत आणि ‘श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, वडाळा महादेव’ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात भरगच्च कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. ‘प्रोजेक्ट भारत’च्या माध्यमातून हे उपक्रम गावागावांत पोहोचवले जाणार आहेत.

प्रमुख कार्यक्रमांची रूपरेषा: तालुक्यातील युवकांसाठी आणि बालकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश असेल: बाल चेतना व नवचेतना शिबिर: मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी विशेष मार्गदर्शन.सामुदायिक पसायदान व हनुमान चालीसा शक्ती आणि भक्तीचा जागर करण्यासाठी सामुदायिक गायन.गावोगावी उपक्रम: तालुक्यातील विविध गावांमध्ये युवकांसाठी प्रेरणादायी सत्रांचे आयोजन.

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती” या उक्तीप्रमाणे श्री श्री रविशंकर जी यांचे कार्य अवघ्या मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, युवकांनी आणि पालकांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. विश्वशांतीसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी एकत्र येऊन प्रार्थना करूया, असे आवाहन ‘दि आर्ट ऑफ लिविंग’ संस्था श्रीरामपूर आणि श्री श्री रविशंकर विद्या मंदिर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button