
अहिल्यानगर ः शिवसेनेच्या दक्षिण उपजिल्हाप्रमुखपदी भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते श्रावण बाळासाहेब काळे यांची निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, ओंकार सातपुते, महेश शेवते, आकाश पवार, नितीन साळवे, विजय साळवे, गौरव शिंदे, तालुकाप्रमुख अजित दळवी, चेतन काळे, सौरभ गिरी, सिद्धू काळे, सत्यम वाकळे, आकाश पवार, ओमकार थोरात, शिवम वाकळे, प्रवीण गायकवाड, पवन शेळके, शक्ती काळोखे, नितीन सुरसे, वैभव चहाल आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
श्रावण काळे यांनी दक्षिणेत शिवसेना पक्षाला सर्वसामान्य वर्गाला जोडून घेण्यासाठी कार्य केले जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष सातत्याने काम करत असून, अनेक कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्यांना आधार मिळाला आहे. हेच ध्येय-धोरण ठेऊन कार्य करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.



