Breking News

विकी इंगळे यांच्यामुळे प्रभाग पाचमधील लढत चुरशीची होणार…

अहिल्यानगर ः  महापालिका निवडणुकीचे वारे जोर धरत असताना, प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे. शहरातील राजकीय वारसा असलेले विकी संजय इंगळे यांनी या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक अधिक चर्चेचा विषय ठरणार आहे.

विकी इंगळे हे शहराचे तत्कालीन पहिले नगराध्यक्ष कै. बाबुराव इंगळे व नगरसेविका सुंदराबाई बाबुराव इंगळे यांचे नातू आहेत. इंगळे परिवाराने नगरच्या राजकारणात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे.
कै. बाबुराव इंगळे यांनी आपल्या काळात नगर विकास, पाणीपुरवठा, आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी केलेले कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. सुंदराबाई इंगळे यांनी नवनीत बार्शीकर नगराध्यक्ष असताना स्थानिक विकास कामांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले होते. हा सामाजिक आणि विकासात्मक वारसा पुढे नेत विकी इंगळे आता सक्रिय राजकारणात पाऊल ठेवत आहेत.
विकी इंगळे म्हणाले की, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोणतेही भरीव विकासकाम झाले नाही. रस्ते, गटार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आणि सार्वजनिक सोयीसुविधा आजही नागरिकांना भेडसावत आहेत. माझे ध्येय सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे आणि प्रभागाचा चेहरा बदलणे आहे.
प्रभाग 5 मध्ये वाढती लोकसंख्या, नागरी समस्यांचा बोजा, तसेच जुनी पायाभूत सुविधा हे मुख्य प्रश्‍न आहेत. विकी इंगळे यांनी निवडणुकीच्या प्रचारात “विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेचा थेट सहभाग” या तीन मुद्द्यांवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच प्रभागात मतदारांशी संवाद मोहिमाही सुरू केली असून, तरुण वर्गात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button