Breking News

महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीर शेडची उभारणी…

शेड उभारून ते भाड्याने दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांचा

अहिल्यानगर :  नगर–मनमाड रोडवरील नागापूर गावठाण परिसरात महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकाने या जागेवर पत्रा शेड उभारून ते भाड्याने दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.
गेल्या सात–आठ महिन्यांपासून या अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही फक्त वरवरची, दिखाऊ ( कारवाई होत असल्याने नागरिकांत संताप वाढला आहे. संबंधिताने महापालिकेच्या रस्त्यावरच गाळे उभारून त्याचे भाडे गोळा करत आहेत.
हे स्पष्ट अतिक्रमण असूनही महापालिका त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही. उलट अतिक्रमण विभागाशी संगनमत करून हे अनधिकृत काम सुरू ठेवण्यास मदत केली जात आहे, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अखेर येथे राहणाऱ्या नागरिकांनी कठोर भूमिका घेतली असून अशोक सप्रे, रमेश सप्रे, येत्या १० दिवसांत कारवाई न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिका आयुक्त यांच्या दालनासमोर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा प्रशासनाला दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button