Breking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक कार्याध्यक्षपदी ऋषिकेश रासकर यांची निवड युवकांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून नावलौकिक वाढवावा – आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर( लक्ष्यवेध न्यूज) :- समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते. आपण ज्या भागात राहतो त्या भागातील नागरिकांचे छोटे-मोठे प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच खरे कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक कार्याध्यक्षपदी ऋषिकेश रासकर यांची निवड झाली असून त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पदाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक कार्याध्यक्षपदी ऋषिकेश रासकर यांना निवडीचे पत्र प्रदान करताना आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, युवक शहर जिल्हाध्यक्ष सुरज कोतकर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, वैभव ढाकणे, नितीन घोडके, दीपक खेडकर, मयूर बलदोटा, जगु शिंदे, रोहन रासकर, बाबासाहेब हराळ आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की, युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजहिताचे काम करणे गरजेचे आहे. आजचा युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत असून त्यांना या प्रवृत्तींपासून दूर ठेवण्यासाठी समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे. युवकांनी पुढाकार घेत चांगली पिढी घडविण्यासाठी काम करावे. ऋषिकेश रासकर यांनी युवकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत. तसेच आमदार संग्राम जगताप यांनी हाती घेतलेल्या हिंदू रक्षणाच्या कामामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

युवक शहर जिल्हाध्यक्ष सुरज कोतकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक कार्याध्यक्षपदी ऋषिकेश रासकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहे. युवकांमध्ये संघटन वाढवून पक्ष बळकट करण्यासाठी ते निश्चितच चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त युवक कार्याध्यक्ष ऋषिकेश रासकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून युवक कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून समाजकार्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. आमदार संग्राम जगताप यांचे हिंदुत्ववादी विचार युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. युवकांचे प्रश्न सोडवून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button