Breking Newsक्राईमदेश-विदेशनोकरी विषयकमहाराष्ट्र

-गळनिंब येथील तरूणाची आत्महत्या -चार जणांवर गुन्हा दाखल; गोवंश हत्येचा संशय

श्रीरामपूर-
कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरे घेऊन जाण्याच्या संशयावरून गळनिंब येथील तरूणाला काही जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला. आपली बदनामी झाल्याचे भितीने या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी चार जणांवर लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत वडीतके असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

दिनेश राकेचा, प्रशांत राकेचा, संकेत खर्डे, सौरभ लहामगे (सर्व रा. कोल्हार ता. राहाता) असे आरोपींचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या सर्व आरोपींनी मयत वडितके यास कत्तलीसाठी गोवंश जनावर घेवून जात असल्याच्या संशयावरून मारहाण केली. तसेच या मारहाणीचे चित्रिकरण करीत ते सोशल मिडियावर व्हायरल केले.

अनिकेतला आपला मारहाणीचा व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हाट्सअपवर ठेवला असल्याचे समजले. त्यामुळे आपली बदनामी तो सहन करू शकला नाही. त्याने गळनिब येथील राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.

मयत अनिकेतचा भाऊ चैतन्य हा घरी आला असता त्यास अनिकेत घरातच फासावर लटकलेला दिसला. त्यांनी तातडीने त्यास खाली घेऊन लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास मृत घोषित केले.

त्यानंतर सर्व नातेवाईक दोन्ही पोलीस ठाण्यात गेले व संबंधित आत्महत्या करण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक करा, त्याशिवाय आम्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून देणार नाही तसेच मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे अमोल वडितके यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button