राजकीय
शहर भाजपच्या मंडल प्रभारीपदी नामदे, वारे, गायकवाड व दांडगे यांची नियुक्ती
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांची माहिती

अहिल्यानगर ः प्रदेश भारतीय जनता पार्टीकडून शहर भाजपच्या मंडल प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.
मोहिते म्हणाले, या नवीन नियुक्त्यांध्ये भिंगार मंडल प्रभारीपदी महेश नामदे, सावेडी मंडल प्रभारी पदी निखील वारे, मध्य मंडल प्रभारी पदी अशोक गायकवाड व केडगाव मंडल प्रभारीपदी ज्योती दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
मंडल प्रभारी पदाच्या माध्यमातून शहरातील चारही मंडल अध्यक्षांना संघटनात्मक कामांसाठी सहकार्य करणे, येणाऱ्या निवडणुकांची तयारी करणे व बूथ कमिटी तयार करण्यासाठी सहकार्य करणे आदींबाबत सहकार्य केले जाणार आहे.



