Breking News

राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल-मंत्री संजय शिरसाट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा

मुंबई (लक्ष्यवेध न्यूज):- दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला आता हवा दिली आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर असे सांगून केले जात नाही. या प्रकरणी एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणालेत.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीनंतर आता दिल्लीतील आम आदमी पार्टीत मोठी बंडाळी उफाळून आली आहे.

यामुळे अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळात हल्लकल्लोळ माजला असताना आता महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर राबवले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी याविषयी एक सूचक विधान केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बहुतांश लोकप्रतिनिधी आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.

संजय शिरसाट म्हणाले, आपचे जे ६-७ खासदार भाजपमध्ये गेले ते राज्यसभेचे सदस्य आहेत. या प्रकरणी आम्हाला काही सूचना किंवा आम्ही ऑपरेशन टायगर राबवतोय असा कोणताही भाग नाही. पण ज्या दिवशी हे ऑपरेशन टायगर करायचे आहे, ते असे सांगून केले जात नाही. आमच्या संपर्कात सर्वजण आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button