Breking News

आ. राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

नाशिक (लक्ष्यवेध न्यूज):-भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल ढिकले  यांच्या पत्नी आदिती ढिकले (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (शनिवारी) सकाळी निधन झाले आहे.अदिती ढिकले यांच्यावर सायंकाळी ५.३० वाजता गणेशवाडी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काल  सायंकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे आमदार राहुल ढिकले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका शासकीय कार्यक्रमानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर  आले होते. त्यांना या दु:खद घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले नाशिकमधील पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ढिकले यांच्या नागचौकातील निवासस्थानी धाव घेत आदिती ढिकले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे आमदार, तसेच नेते मंडळी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button