शनिवारी चौकार-षटकारांसह धावांचा पाऊस, रविवारी मात्र दुष्काळ

डबल हेडर सामन्यात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्ज व राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात चौकार-षटकारांसह धावांचा पाऊस पडला. दिल्ली व पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांमिळून तब्बल ५२९ धावा चोपल्या गेल्या. दोन्ही संघांमिळून ३३ षटकार व ४९ चौकार मारले गेले, तर रात्री झालेल्या सामन्यात राजस्थान व हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात ४५७ धावांचा पाऊस पडला. या सामन्यात दोन्ही संघांमिळून २३ षटकार व ४६ चौकारांची आतिषबाजी झाली. दिल्लीकडून केएल राहुलने १५७ धावांची नाबाद खेळी केली तर राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने आक्रमक शतक पूर्ण केले. पंजाब व हैदराबाद यांनी मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलााग केला. रविवारी दुपारी चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात जायंटस व रात्री लखनऊ सुपर जायंटस व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात धावांचा दुष्काळ जाणवला.
लोस्कोरींग झालेल्या या दोन्ही सामन्यात अनुक्रमे गुजरात जायंटस व केकेआर यांनी विजय मिळवला. केकेआर व लखनऊ यांच्यातील सामना समान धावसंख्या झाल्याने टाय झाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा वापर करण्यात आला. त्यात केकेआरने विजय मिळवला. आठपैकी सहा सामन्यात पराभव झाल्यामुळे लखनऊचा संघ गुणलालिकेत शेवटच्या दहाव्या स्थानवर ढकलला गेला आहे.
रविवारी दुपारी गुजरात व चेन्नई यांच्यातील सामन्यात गुजरातने चेन्नईचा ८ गडी राखून पराभव केला व गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईने दिलेले १५९ धावांचे आव्हान गुजरातने सहज पार केले. साई सुदशनने केलेल्या ४६ चेंडूतील ८७ धावामुळे गुजरातने हा सामना सहज खिशात घातला. साईशिवाय कर्णधार शुभमन गिलने ३३ तर जॉस बटलरने नाबाद ३९ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्ऩईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केलेल्या संयमी ७४ धावांमुळे चेन्नईला १५८ धावांपर्यंत मजल मारता आली.
रात्री झालेल्या सामन्यात केकेआरने लखनऊचा सुपरओव्हमध्ये पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १५५ धावा केल्या. लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या अफलातून गोलंदाजीमुळे केकेआरचा संघ अडचणीत सापडला होता. मोहसीने चार षटकात अवघ्या २३ धावा देत पाच गडी बाद केले. केकेआर सव्वाशे धावांचा टप्पा तरी पार करतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र उपकर्णधार रिंकू सिंगने तळातील फलंदाजांना हाताशी धरत एकाकी झुंज देत ५१ चेंडूत ८३ धावांची नाबाद वेगवान खेळी केल्याने केकेआरने १५८ धावा उभ्या केल्या. विजयी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांचीही तारांबळ उडाली.
मिचेल मार्श लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार पंत व मार्करम यांनी दुसर्या गड्यासाठी ५७ धावांची भागिदारी केली. मात्र हे दोघे लगोलग बाद झाल्यानंतर लखनऊचा डाव कोसळला. नियमित अंतराने केकेआरच्या गोलंदाजांनी लखनऊचे फलंदाज बाद केल्याने विजयी लक्ष्य गाठणे लखनऊला अवघड झाले होते. मात्र शेवटच्या षटकात कार्तिक त्यागीने टाकलेल्या दोन नोबॉलमुळे व हिम्मत सिंग व मोहमद शमी यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीमुळे १५८ धावांचा पल्ला गाठला. त्यामुळे सामना टाय झाला. समान धावसंख्या झाल्यामुळे या हंगामात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा वापर करण्यात आला. आतापर्यंतच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या निकलस पुरनला लखनऊच्या व्यवस्थापनान सलामीला पाठवले आणि ती सर्वात मोठी घोडचूक ठरली. तो नारायणच्या पहिल्याचे चेंडूवर त्रिफळाबाद झाला. त्यानंतर दुसर्या चेंडूवर पंतने एक धावा घेतली. तिसर्या चेंडूवर मार्करमही बाद झाला. त्यामुळे केकेआरला जिंकण्यासाठी ६ चेंडूत अवघ्या दोन धावांचे लक्ष्य मिळाले. सलामीला आलेल्या रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.



