Breking News

मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई – मंत्री गिरीश महाजन

नाशिक ( लक्षवेध न्यूज):- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांसोबत नागरिकांच्या  सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच शहरातील खड्डे सात दिवसांत बुजविण्याचा अल्टिमेटम जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन  यांनी दिला. मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महापौर हिमगौरी आडके-आहेर, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. ॲड  . राहुल ढिकले, स्थायी समिती सदस्य मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, स्मिता झगडे, उपायुक्त साताळकर, पोलीस लक्ष्मीकांत साताव्ळ उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाजन म्हणाले की, सिंहस्थपूर्व रस्ते, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन, फायबर केबल, ड्रेनेज व इतर पायाभूत सुविधा उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी कामांच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. सुरक्षेतील कोणतीही त्रुटी तातडीने दूर करून अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता केले. घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

अंबड व सातपूर एमआयडीसीतील  रस्त्यांची दुरुस्ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. खड्डे बुजविताना मुरूम किंवा मातीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या. ठेकेदार मनमानी करत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत, कामे करताना कोणाचीही वाट पाहू नका; शासनस्तरावर आवश्यक ती मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button